संगमनेर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात शासनाच्या आदेशान्वये दिनांक 12/08/2022 ते दिनांक 16/08/2022 विविध उपक्रम राबविण्यात आले त्यानुसार दिनांक दि. 13/08/2022 ते 15/08/2022 अखेर मुख्य मार्केट यार्डमधील कार्यालय व मेनगेट येथे विद्युत रोशनाई करण्यात आली. तसेच दिनांक 12/08/2022 रोजी बाजार समितीचे यार्डात हर घर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी बाजार समितीच्या यार्डात कर्मचारी, हमाल-मापाडी यांनी रँली काढुन यार्डात येणाऱ्या प्रत्येक बाजारघटकांना हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमाबाबत जनजागृती केली तसेच दिनांक 13/08/2022 रोजी बाजार समितीचे सचिव श्री.सतिष गुंजाळ साहेब यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले त्यानंतर मुख्य मार्केट यार्डात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त सेल्फी पॉईंट उभारण्यात आलेला होता त्यामध्ये सर्व हमाल-मापाडी, शेतकरी, व्यापारी व इतर बाजार घटकांनी सेल्फी पॉईंटमध्ये सेल्फी घेण्याचा आनंद लुटला तसेच दिनांक 14/08/2022 रोजी मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर मा.उपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी संस्थेच्या रँलीमध्ये बाजार समितीचे सर्व कर्मचारी सहभागी झाले त्यानंतर मा.कांदळकर साहेब, उपनिबंधक, सहकारी संस्था,संगमनेर व मा.वाकचौरे साहेब, सहा.निबंधक, सहकारी संस्था, संगमनेर यांचे उपस्थितीत बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले त्यांनतर दिनांक 13/08/2022 ते दिनांक 15/08/2022 रोजी मा.तहसिलदार कार्यालय व प्रांत कार्यालय यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत कर्मचारी हमाल मापाडी सहभागी झाले तसेच दिनांक 15/08/2022 रोजी मुख्य मार्केट यार्डमध्ये बाजार समितीचे सचिव श्री.सतिष गुंजाळ यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले अशाप्रकारे बाजार समितीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम राबविले. त्यानंतर दि.17/08/2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता समुह राष्ट्रगीत गायन केले.
