दुय्यम बाजार

घारगाव (आंबी खालसा) दुय्यम बाजार

घारगाव आंबी खालसा येथे 15 एकर क्षेत्र मारुती मंदीर देवस्थान ट्रस्ट आंबी खालसा 30 वर्षाचा भाडेकराराने घेवुन शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार सुरु करणार आहे.

कर्जुले पठार दुय्यम बाजार

कर्जुले पठार उपबाजारसाठी जमिन 2 हे.04 आर हंस्तातर करणेसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे.

वडगावपान दुय्यम बाजार

सदरील मौजे वडगावपान येथील उपबाजार आवाराचे शासकीय शुल्क भरून हस्तांतरीत केलेले आहे. त्या ठिकाणी अद्यावत मार्केट तयार करण्यासाठी जमिन सपाटीकरण करण्याचे व संरक्षण भिंतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तसेच त्याठिकाणी लवकरात लवकर फ्लॉवर या नियमीत शेतीमालाचे लिलाव सुरू करणेकामी बाजार समितीने स्वनिधीतुन 2 वे-ब्रिज टाकलेले आहे. कोव्हीड-19 व जानावरांना होणाऱ्या लंपी आजारामुळे शासनाचे आदेशानुसार स्थगित ठेवलेला जनावरे बाजार दर शनिवारी जनावरे भरविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जनावरांठी प्रमुख्याने 3 शेड बांधण्यात आलेल्या असुन पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच स्त्री-पुरूष शौचालये बांधण्यात आलेले आहे. सबयार्डमध्ये शासनाचे राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे आणि कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेर उपबाजार वडगावपान यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी 1000 मे.टन गोदाम बांधलेले आहे. बाजार समितीने सबयार्ड वडगावपान येथे नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर लुज कांद्यांचे मार्केट सुरु करण्यासाठी ताडपत्री बांबुच्या मोठ-मोठ्या शेड उभारलेल्या असुन माहे मे 2024 पासुन लुज कांद्याचे जाहिर लिलाव सुरु झालेले आहे. तसेच सदर ठिकाणी नियोजीत विविध पायाभुत व उत्पादीत विकास कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर केलेला आहे.

साकूर दुय्यम बाजार

सरकारी जाहिरनामा नं.सी.एमआर 12-70 कास्ती साकूर सबयार्ड संगमनेर-3883 दि.3-3-1993 अन्वये सबयार्डवर भुसार व शेळ्या मेंढ्या खरेदी विक्री व्यवहार सुरु झाले.

घारगांव दुय्यम बाजार

सरकारी जाहिरनामा नं.सीएमआरआर 12-70 कास्ती घारगांव सबयार्ड संगमनेर-12239 दि. 24-8-1992 अन्वये या ठिकाणी शेळ्यामेंढ्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु झाले येथे संस्थेची जागा नाही. ग्रामपंचायतीचे जागेवर व्यवहार सुरु आहेत.

तळेगाव दुय्यम बाजार

सरकारी जाहिरनामा नं.सीएमआरआर 12/77 कास्ती-सबयार्ड संगमनेर-12232 दि.24/8/9992 अन्वये या ठिकाणी शेळ्यामेंढ्या खरेदी विक्री व्यवहार सुरु होते. या ठिकाणी ग्रामपंचायतीने 1 हेक्टर क्षेत्र विनामुल्य कायमस्वरुपी संस्थेस ताब्यात असलेले क्षेत्र देण्यास नकार दिलेला असल्यामुळे सध्यास्थितीत तेथे खरेदी विक्री व्यवहार बंद आहे.

आश्वी बु. दुय्यम बाजार

सरकारी जाहिरनामा नं. पणन आश्वी बु ।। सबयार्ड संगमनेर-29/23/89 दिनांक 1/8/1989 अन्वये आश्वी बु ।। येथे भुसार शेतीमालाचे लिलाव सुरु झाले. ग्रामपंचायतीने सुमारे 1 हेक्टर 10 आर (बाजार तळ ) जागा विनामुल्य कायमस्वरुपी वापरावयास दिली.

निमोण दुय्यम बाजार

सरकारी जाहिरनामा नं. एपीएमसी/37/77 दि.9-11-1977 अन्वये निमोण येथे कांदा या शेतमालाची खरेदी –विक्री सुरु झाली. निमोण उपबाजार आवाराचे क्षेत्र 1 हेक्टर 20 आर एवढे आहे.