सदरील मौजे वडगावपान येथील उपबाजार आवाराचे शासकीय शुल्क भरून हस्तांतरीत केलेले आहे. त्या ठिकाणी अद्यावत मार्केट तयार करण्यासाठी जमिन सपाटीकरण करण्याचे व संरक्षण भिंतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तसेच त्याठिकाणी लवकरात लवकर फ्लॉवर या नियमीत शेतीमालाचे लिलाव सुरू करणेकामी बाजार समितीने स्वनिधीतुन 2 वे-ब्रिज टाकलेले आहे. कोव्हीड-19 व जानावरांना होणाऱ्या लंपी आजारामुळे शासनाचे आदेशानुसार स्थगित ठेवलेला जनावरे बाजार दर शनिवारी जनावरे भरविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जनावरांठी प्रमुख्याने 3 शेड बांधण्यात आलेल्या असुन पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच स्त्री-पुरूष शौचालये बांधण्यात आलेले आहे. सबयार्डमध्ये शासनाचे राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे आणि कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेर उपबाजार वडगावपान यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी 1000 मे.टन गोदाम बांधलेले आहे. बाजार समितीने सबयार्ड वडगावपान येथे नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर लुज कांद्यांचे मार्केट सुरु करण्यासाठी ताडपत्री बांबुच्या मोठ-मोठ्या शेड उभारलेल्या असुन माहे मे 2024 पासुन लुज कांद्याचे जाहिर लिलाव सुरु झालेले आहे. तसेच सदर ठिकाणी नियोजीत विविध पायाभुत व उत्पादीत विकास कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर केलेला आहे.
