कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेर

संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या स्थापना दि.19-11-1959 रोजी झाली असून तिचे प्रत्यक्ष कामकाज दि.1-9-1962 पासून सुरु झाले.दि.17/8/1988 पुर्वी बाजार समितीचे कायक्षेत्र संगमनेर व अकोले असे दोन तालुक्याचे होते. त्यावर शासनाने संगमनेर बाजार समितीचे विभाजन करुन संगमनेर व अकोले या दोन तालुक्यासाठी दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन केल्या, त्यामुळे आता संगमनेर बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे संगमनेर तालुका येवढेच आहे. दि.29-04-2023 रोजी बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यामुळे लोकनियुक्त संचालक मंडळ अधिकारावर आले. दि.12-05-2023 रोजी सभापती आणि उपसभापती यांची निवडणुक घेण्यात आली.सभापती म्हणून श्री.शंकरराव हनमंता खेमनर व उपसभापती म्हणून श्री.गिताराम दशरथ गायकवाड यांची निवड झाली. सध्या बाजार समितीचे सचिव मा.श्री.सतिष माधवराव गुंजाळ हे कामकाज पहात आहे.

बाजार समितीचे कार्यश्रेत्र

सरकारी जाहिरनामा नं.एपीएम -10 संगमनेर दि. 22-4-1959 अन्वये या बाजार समितीचे कार्यक्षेत्र संगमनेर व अकोले असे दोन तालुक्यांचे होते. परंतु मा.जिल्हा उपनिबंधक साहेब,सहकारी संस्था, अहमदनगर यांनी अधिसूचना क्र.एपीएमसी–डीव्ही –संगमनेर –अकोले-14555-88, दि.17-6-1988 अन्वये विभाजन करुन संगमनेर व अकोले या दोन तालुक्यासाठी दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन केल्या व त्या दि.17-6-1988 पासून स्वतंत्रपणे कामकाज पहात आहेत. आता संगमनेर बाजार समितीचे कार्यक्षेत्र संगमनेर तालुका एवढे झाले आहे.

नियमीत शेतीमाल

सरकारी जाहिरनामा नं. एपीएम-10-संगमनेर –दि. 13-7-1964 अन्वये गुळ,ज्वारी,बाजरी,गहू,साळ (हस्कड व अनहस्कड) हरभरा,तुर,मठ,उडीद,चवळी,कर्डी,शेंगा,(फोडलेल्या व न फोडलेल्या ) हावरी, टाँमटो ,गाय, बैल, म्हैस, रेडे, घोडे, शेळ्यामेंढ्या तसेच सरकारी जाहिरनामा नं-ए.एमकेटी –संगमनेर 19/04/1984 अन्वये ताज्या भाज्या, इतर भाज्या, मोसंबी, संत्री, आंबा, केळी, द्राक्ष, डाळींब, चिक्कु, खरबुजे, कलिंगड, पपई, पेरु, बोरे व सिताफळ यांचे निमयन करण्यात आले तसेच नियमन आणि सरकारी जाहीरनामा नं एपीएम -1-27543 दि.23-4-94 अन्वये मिरची आणि फुले यांचे नियमन करण्यात आले. तसेच मा.जिल्हा उपनिबंधक, सह,संस्था ,अहमदनगर यांच अधिसूचना जा.क्र पणन – 1 कृउबास –संगमनेर शेतीमाल 7975-05 दि-30-6-2005 अन्वये सोयाबीन,चिंच व चिंचोका यांचे नियमन करण्यात आले. शासनाने दि.5 जुलै 2016 रोजी बाजार समितीचे आवाराबाहेरील फळे भाजीपाला शेतीमालावरील नियमन मुक्त केलेले आहे. तसेच शासनाने सर्व शेतीमालावरील शेतकरी आडत बंद केलेली आहे.

सर्वसाधारण

संगमनेर तालुका व त्याचा सर्व परिसर हा पावसाच्य़ा पाण्य़ावर अवलंबून आहे. पर्जन्यछायेत हा सर्व प्रदेश आलेला आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण विहीर व पाटपाणी यावर आणि उपसासिंचन याद्वारे पीके घेण्यात येतात. ऊसासारखे बारमाही पिके पण घेतली जातात.

पर्जन्यमान

भौगोलिक दृष्टया संगमनेर हा तालुका पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो.त्यामुळे जेमतेम पाऊस पडतो. विहीर आणि उपसा जलसिंचनाद्वारे उस व नगदी पिके घेतली जातात.भुसार व भाजीपाला देखील येथील शेतकरी घेतो.कमी पाण्यावर चांगली पिके शेतकरी घेतात.

नियमित शेतीमालाचा अवक कालावधी

पिकांचे नांव हंगाम
भु.शेंगा जुन ते ऑगस्ट
भाजीपाला, कांदा वर्षभर
बाजरी, टोमॅटो आक्टोबर ते जुलै
गहू,हरबरा फेब्रुवारी ते जून
टोमॅटो जून ते आँक्टोबर- वर्षभर

इलेक्शन (निवडणूक)

दि.12/05/2023 पासुन विद्यमान सभापती मा.श्री.शंकरराव हनमंता खेमनर व संचालक मंडळ कामाकाज पहात होते. तसेच श्री.सतिष माधवराव गुंजाळ, सचिव म्हणून कामकाज पहात असून त्यांचे सर्व कर्मचा-यांनी त्यांचे देखरेखीखाली उत्तम कामकाज केलेले आहे.

वाहतूक व्यवस्था

काँक्रिटचे रस्ते, कच्चे रस्ते, याद्वारे वाहतूक करण्यात येत आहे. ट्रक, टॅम्पो, ट्रॅक्टर, वाहानातून मालाची ने-आण करण्यात येते. या तालुक्यात रेल्वेची व्यवस्था नाही. मार्केट यार्डावर तालुक्यातून व खेड्यापाड्यातून शेतीमालाची आवक होते. भावी योजना बाजार समितीचे उपबाजार आवार मौजे व़डगावपान येथे मुलभुत व उत्पादीत सुविधा तसेच कोल्ड स्टोअरेज बांधण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याचप्रमाणे अहवाल वर्षात नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर लुज कांद्याचे मार्केट सुरु केलेले आहे. तसेच उपबाजार घारगाव याठिकाणी मौजे आंबी खालसा येथे जमीन भाडेकराराने घेतलेली असुन त्याठिकाणी जमीनीचे सपाटीकरण करून प्लॉट पाडुन ते विविध व्यापाऱ्यांना वितरीत करण्यात आलेले असुन तात्काळ त्याठिकाणी भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यावहार सुरू होणार आहे.

प्रशासकीय

दि.12/05/2023 पासून सभापती म्हणून श्री.शंकरराव खेमनर, व मा.संचालक मंडळ कामकाज पहात आहे. त्यांनी उत्तम पध्दतीने कामकाज सांभाळुन नेहमीच संस्थेच्या हिताची जपवणूक केली आहे. बाजार समितीचे सचिव श्री.सतिष माधवराव गुंजाळ व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी उत्तम कामकाज केलेले आहे.

स्टाफ

संस्थेने मुख्य सचिव म्हणून श्री.सतिष गुंजाळ यांनी त्याचे अधिकारी वर्गाकडून व कर्मचा-यांकडून उत्तमरित्या कामकाज करुन घेतले आहे त्यामुळे संस्थेचे उत्पन्नात वाढ झालेली आहे.

मान्यवर भेटी

अहवाल दि. 1/4/2024 ते 31/3/2025 मध्ये खालील मान्यवर अधिकारी यांनी संस्थेस भेटी दिल्या व जरुर ते मार्गदर्शन केले.

  1. मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब, मा.मंत्री, महसुल महाराष्ट्र राज्य, मुंबई
  2. मा.आ.डाँ.सुधिरजी तांबे साहेब, माजी सदस्य विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई
  3. मा.सौ.दुर्गाताई सुधिर तांबे,नगराध्यक्षा,संगमनेर नगरपालिका, संगमनेर
  4. मा.श्री.सत्यजित तांबे पाटील, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई
  5. मा.श्री.रणजितसिंह देशमुख, संचालक,संगमनेर सह. दुध उत्पादक व प्रक्रिया संघ व चेअरमन महानंदा दुध, मुंबई
  6. मा.श्री.बाजीराव खंडुजी खेमनर पाटील, अध्यक्ष,शेतकरी विकास मंडळ.
  7. मा.श्री.प्रतापराव (बाबा) ओहोळ, चेअरमन, सह.महर्षि भाऊसाहेब संतुजी थोरात सह. साखर कारखाना लि.संगमनेर
  8. मा.सौ.सुनंदाताई जोर्वेकर, सभापती, पंचायत समिती, संगमनेर
  9. मा.श्री.संपतराव डोंगरे, चेअरमन संगमनेर शेतकी सह संघ
  10. मा.श्री.साहेबराव गडाख, व्हा.चेअरमन,संगमनेर सह. दुध उत्पादक व प्रक्रिया संघ
  11. मा.श्री.रामहारी कातोरे,चेअरमन, शॅम्प्रो, संगमनेर
  12. मा.श्री.हौशिराम सोनवणे, चेअरमन,राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, संगमनेर
  13. मा.श्री.राजेंद्र कडलग, चेअरमन, गरुङ कुकुटपालन, संगमनेर
  14. मा.श्री.संतोष हासे, व्हा.चेअरमन, सह.महर्षि भाऊसाहेब संतुजी थोरात सह. साखरकारखाना लि.संगमनेर
  15. मा.श्री.विवेक रसाळ साहेब, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पूणे.
  16. मा.श्री.गणेश पुरी साहेब, जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था,अहमदनगर
  17. मा.श्री.कोरे साहेब, उपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर

कृषि उत्पन्न बाजार समिती,संगमनेर,जि-अहमदनगर

तक्ता नं. 1

दि. 1/4/2024 ते 31/3/2025

बाजार समितीचा कोड रु

अ.क्र. नियमाखालील बाजाराची महत्वाची माहिती तपशील
1 बाजार समितीच्या स्थापनेची तारीख दि. 19/11/1959
2 बाजार क्षेत्रांत समाविष्ट तालुक्यातील गांवे 171 (संपूर्ण संगमनेर तालुका)
3 समाविष्ट तालुक्यातील एकूण गावांची संख्या 171
4 पैकी बाजार क्षेत्रांत समाविष्ट गावांची संख्या 171
5 बाजार ज्या गावी आहे त्या गावांची नावे संगमनेर, साकूर, घारगांव, वडगावपान,
निमोण, तळेगाव, आश्वी बु।।, कर्जुले पठार
6 बाजार आवार झाल्याची अधिसूचना व तारीख संगमनेर – 02/06/1965
निमोण – 09/11/1977
तळेगाव – 24/08/1992
आश्वी बु।। – 21/01/1985
साकूर – 03/02/1993
घारगांव – 24/08/1962
वडगावपान – —
7 बाजार समितीचे बाजार स्वतःच्या मालकीचे आहेत काय? संगमनेर – होय
निमोण – होय
तळेगाव – नाही
आश्वी बु।। – नाही
साकूर – नाही
घारगांव – नाही
वडगावपान – होय
8 असल्यास त्यांचे क्षेत्र (हे.आर.) संगमनेर – 6 हे. 27 आर
निमोण – 1 हे.
तळेगाव – 1 हे.
आश्वी बु।। – नाही
साकूर – नाही
घारगांव – नाही
शिबलापूर – नाही
वडगावपान – 6 हे. 22 आर
कर्जुले पठार – 2 हे. 04 आर
9 जनावरांचा बाजार आहे काय? संगमनेर, साकूर व वडगावपान येथे जनावरांचा बाजार आहे.
10 कार्यालयाची स्वतःची इमारत आहे काय? संगमनेर, निमोण – होय